धुळे तालुक्यातील बोरीस गावात एकाचवेळी मध्य रात्रीत पाच ते सहा जणांनी गावातील 15 बंद घरांना एकाच वेळी लक्ष केले.त्यात बाजार समितीचे माजी सभापती सुभाष दादा देवरे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष केले आहे .या 15 घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा अंदाजे साडेचार ते पाच लाखांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. बोरीस गावातील 15 बंद घरांना चोरट्यांनी एकाच वेळी मध्यरात्री लक्ष केल्याने धुळे तालुका हादरला आहे. पोलिसांचा चोरट्यांवर वचकच राहिलेला नाही.अशी चर्चा ग्रामस्थ सुरू होती.