वणी: शहरातील प्रगती नगर येथे घरफोडी 21 हजाराचा मुद्देमाल लंपास
Wani, Yavatmal | Oct 14, 2025 प्रगतीनगर वॉर्ड क्रमांक 3, वणी येथे राहणाऱ्या निवृत्त शिक्षक वसंत माणिकदास ठमके यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे ₹21,000 किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना 6 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.