पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील युवासेना जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा
पोलादपूर तालुक्यातील युवासेना जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आज रविवारी दुपारी २ च्या सुमारास कोकण विभागाचे युवासेना सचिव विकास गोगावले यांच्या शुभहस्ते आणि जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पार पडला तसेच शिवसैनिकांच्या बुलंद आवाजाने कार्यालयाच्या उद्घाटनाची घडामोड ऐतिहासिक ठरली. या कार्यालयाद्वारे जनतेशी संपर्क अधिक दृढ, गतिमान आणि तंत्रज्ञानाशी जोडलेला होईल याचा विश्वास वाटतो. भगवा झेंडा आणि युवासेना कार्यकर्त्यांचा जोश हे आमच्या पक्षाच्या कट्टर विचारधारेचे आणि जनसेवेच्या मिशनचे प्रतीक आहे. या शुभ प्रसंगी शिवसेना, युवा सेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.