महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक प्रकरणी कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याच्या सात हजार ४४१ बाटल्या, तसेच टेम्पो असा २३ लाख ७३ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले.