जळगाव शहरातील मराठा हॉटेलचे व्यावसायिक तरूणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी नातेवाईक व मित्र परिवार यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शुभम संजय मराठे वय २७ रा. नेहरू नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.