दर्यापूर: करपलेल्या पऱ्हाटी व सोयाबीनसह शिवसैनिक धडकले तहसील कार्यालयावर;ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व शेतकऱ्यांनी करपलेली पऱ्हाटी व सोयाबीन घेऊन आज दुपारी १ वाजता दर्यापूर तहसीलवर धडक दिली.दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुके ओला दुष्काळग्रस्त घोषित करावेत आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.पावसाच्या अतिवृष्टीमुळे तूर,सोयाबीन,कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.