नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणेच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माघी गणेशोत्सवातील श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक पारंपारिक 22 विसर्जन स्थळांच्या जवळ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आपल्या श्रीमूर्तींचे विसर्जन महानगरपालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अभियांत्रिकी विभागाच्या वतीने शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली 22 ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली असून त्यावर संबंधित विभाग कार्यालयांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे निरीक्षण व दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व संजय शिंदे यांचे नियंत्रण असणार आहे.