बुलढाणा: शहरातील चिखली रोड येथे कुंटणखाना चालवणाऱ्या आंटी विरुद्ध गुन्हा दाखल
बुलढाणा शहरातील चिखली रोड वर ४२ वर्षीय आंटी कुंटनखाणा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात आणि एलसीबी प्रमुख अंबुलकर यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने १२ आक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता देहविक्रीचा हा अड्डा उध्वस्त केला.आंटी,दोन तरुणी, एका ग्राहकाला पोलिसांनी रंगेहात पकडले.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटणखाना चालवणाऱ्या आंटी विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.