दिग्रस: लायगव्हाण क्र. २ ग्रामस्थांचा संताप उसळला, सांस्कृतिक भवनाचे कुलूप उघडण्यासाठी तहसीलदार ठाणेदार, बीडीओना निवेदन
दिग्रस तालुक्यातील लायगव्हाण क्र. २ या गावात शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेले सांस्कृतिक भवन हे गावातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी बांधण्यात आले आहे. मात्र, गावातील गौतम धवने यांनी केलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सचिवाने या भवनाला १४ ऑक्टोबरला कुलूप लावले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, ग्रामस्थांनी आज दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान एकत्र येत पंचायत समिती, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात धडक दिली.