रोहा: रायगड जिल्ह्यातील रोहा-अष्टमी नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड
Roha, Raigad | Nov 19, 2025 आज बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील रोहा-अष्टमी नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झालेले राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार राजू जैन यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांसोबत संवाद साधत त्यांच्या प्रभागाचा सविस्तर आढावा घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करून विजयासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.