जालना: चार महिन्यांपासून फरार असलेला अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Jalna, Jalna | May 29, 2026 चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पीडित मुलीचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार खादगाव (ता. बदनापूर) येथील 39 वर्षीय महिलेने 5 फेब्रुवारी 2026 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीस दीपक राजू जाधव रा. माळशेंद्रा, ता. जि. जालना याने फूस लावून पळवून नेले होते.