भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या दिवशी बुधवारी (ता. १४) दुपारी सव्वाच्या सुमारास काळेवाडीतील धनगरबाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली.ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०) असे मृत बहिणींची नावे आहेत.