राजूरा: राजुरा भाजपा जनसंपर्क कार्यलयात विठ्ठलवाडा पं.स. क्षेत्रातील शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट
भाजप हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. विठ्ठलवाडा पं.स.क्षेत्रातील शेतकरी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार भोंगळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दि.११ नोव्हेंबरला २ वाजता भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये मधुकर लखमापूरे ,इंद्रपाल मडावी, किशोर फरकडे, शरद कन्नाके, आदींचा समावेश आहे.