नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपारा रिजन्सी हॉल येथे जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांनी रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, वीज आदींसह विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या व मागण्यांचे निवेदन आमदारांना दिले. यावेळी महानगरपालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.