अलिबाग: तब्बल दोन तासानंतर शेकाप चे रास्तारोको आंदोलन स्थगित..@raigadnews24
Alibag, Raigad | Oct 7, 2025 अलिबाग शहराकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने आज शेतकरी कामगार पक्षाने राज्याच्या महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे व राज्यप्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग वडखळ मार्गावरील पेझारी चेकपोस्ट येथे रास्तारोको आंदोलन केले. संबंधित प्रशासन जो पर्यंत योग्य दखल घेत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका शेकाप ने घेतल्याने हे आंदोलन तब्बल दोन तास सुरू होते..