नागपूर ग्रामीण: गोधनी टी-पॉईंट परिसरात भरधाव कारचा अपघात; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
गोधनी टी-पॉईंट अंतर्गत येणाऱ्या चक्कीखापा रोडवर आज दुपारी एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याखाली उतरली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी एक कार चक्कीखापा रोडवरून अतिशय वेगाने जात होती. गोधनी टी-पॉईंटजवळ पोहोचताच अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेल