जावळी: सातारा जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर करहर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली आढावा
Jaoli, Satara | Jun 16, 2025 सातारा जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या करहर, ता. जावली येथे आषाढी एकादशी दिवशी हजारो भाविक- भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशी सोहळा उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडावा तसेच भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी करहर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रशासकीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.