हिंगोली: जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवरून शिक्षण अधिकारी यांच्या उपोषणाचा इशारा शाळेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
हिंगोली शहरालगत अंतुले नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या निपुण महाराष्ट्रामध्ये गुणवत्ता कमी तसेच इतर योजनेच्या अमलबजावणी होत नसल्याने चक्क शिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या समोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यभर गाजलेल्या प्रकरणामुळे शाळा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपोषण स्थगित करण्याचा आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी निर्णय घेतला आहे.