वाशिम: भटउमरा परिसरात मुसळधार पाऊस नदीकाठाच्या शेतात सर्वत्र गुढग्याएव्हडं पाणी
Washim, Washim | Sep 16, 2025 वाशिमच्या भटउमरा परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळं नदीकाठाच्या शेतात सर्वत्र गुढग्याएव्हडं पाणी साचलय. या पुरामुळं सोयाबीन पिकाचं मोठया प्रमाणात नुकसान झालं असून शेंगाच्या अवस्थेत असलेलं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय.