बीड ग्रामीण पोलिसांनी सिंदफना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई केली आहे. कुर्ला शिवारात छापा टाकला असता, एक ट्रॅक्टर रेती भरताना आढळून आला. पोलिसांना पाहताच चालक ट्रॉली नदीपात्रात सोडून फरार झाला.स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणण्यात आली.या प्रकरणी गणेश हनुमानराव लाखे, रा. एरंडगाव याच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती गुरुवार दि 25 डिसेंबर रोजी, दुपारी 3 वाजता प्रसार माध्यमातून