जालना: जिल्हाधिकार्यांच्या हस्ते वृक्षांना मोफत पाणी देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ; युवा शक्ती आणि उज्वल संस्थेचा पुढाकार
Jalna, Jalna | Apr 4, 2026 जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणि सामाजिक न्याय भवन परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांना उन्हाळ्यात पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, लावलेली वृक्ष जगली पाहिजेत यासाठी युवा शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेत झाडांना मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शनिवार दि. 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले.