नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा सतर्क मोडवर असून वर्धा नगर परिषद हद्दीत 7 ठिकाणी चौक्या उभारून निगराणीची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे.तसेच आचारसंहिता भंग टाळण्यासाठी सतत गस्त सुरू आहे तर स्थायी निगराणी पथकांकडून वाहनांचे काटेकोरपणे तपासणी केली जात आहे,होणाऱ्या निवडणुका शांततेत व पारदर्शक पार पाडाव्या यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दिसून आले आहे.