जालना: साळेगाव तांडा वार्ड क्र. २ मधील विकासकामे रखडली; ग्रामपंचायत सदस्य संजय राठोड यांचा सरपंचांवर गंभीर आरोप..
Jalna, Jalna | Jun 14, 2026 साळेगाव तांडा वार्ड क्र. २ मधील विकासकामे रखडली; ग्रामपंचायत सदस्य संजय राठोड यांचा सरपंचांवर गंभीर आरोप.. आज दिनांक 14 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील साळेगाव तांडा येथील वार्ड क्रमांक २ मधील विकासकामे रखडल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय राठोड यांनी केला आहे. अंडरग्राउंड नालीच्या चेंबरचे काम अद्याप अपूर्ण असून, गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठाही नियमित होत नस