खुलताबाद: खुलताबादमध्ये भाजप- राष्ट्रवादीत रस्सीखेच,उपनगराध्यक्षासाठी उद्या मतदान, बहुमतासाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची
नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून, या लढतीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.भाजपकडून प्रशांत बंब, तर राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत.नगरपरिषदेत राष्ट्रवादीकडे ९, भाजपकडे ७ नगरसेवक असून उर्वरित संख्याबळ काँग्रेसकडे आहे.मंगळवारी हात उंचावून मतदान होणार आहेत