कोविड-19 काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे अद्यापही सुरू न झाल्याने वर्धा लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन खासदार अमर काळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत, कोविडपूर्वीचे सर्व महत्त्वाचे रेल्वे थांबे तात्काळ पूर्ववत करण्याची ठोस मागणी केली आहे. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.ही माहिती दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या