पालघर: विदर्भ,मराठवाड्यातील निकषानुसार कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी; आ.राजेंद्र गावित यांची मागणी
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात भात पीक व फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्याप्रमाणे विदर्भ मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्याच निकषानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी राज्य सरकारकडे केली आहे.