खटाव: वडूज विषबाधा प्रकरणात तीन दुकानातील किराणा सामान अन्न व औषध प्रशासन विभागाने केले सीलबंद
Khatav, Satara | Sep 26, 2025 वडूज येथील वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स आणि साई बाझार यांनी स्थानिक पातळीवर तयार केलेले वरवीचे पीठाची भाकरी खाल्ल्यामुळे वडूज पंचक्रोशीतील लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.यातील ३६ रूग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली असून वैभव ट्रेडिंग व अरिहंत ट्रेडर्स यांच्या गोदामातील एक लाख तीन हजार रुपये किंमतीचा किराणा सामान सिलबंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी तुषार शिंगाडे यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता माहिती दिली.