भंडारा: दारू पीत बसलेल्या दोन मित्रांमध्ये वाद; दारूच्या बाटलीने एकाला मारहाण मारहाण, पलाडी भीलेवाडा रोडवरील घटना
दारू पीत बसलेल्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर दारूच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महेश गजानन मेश्राम (वय ३५) हे जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपी माखन चव्हाण (वय ४२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास पलाडी भीलेवाडा पुलाजवळ NH 53 रोडवर घडली. महेश मेश्राम आणि माखन चव्हाण दोघेही मित्र आहेत. घटनेच्या वेळी ते दोघेही रस्त्याच्या कडेला दारू पीत होते.