जळगाव: उस्मानिया पार्क परिसरातून प्रौढ झाले बेपत्ता; शहर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणारे ५२ वर्षीय व्यक्ती हे गावात जावून येतो असे सांगून १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रविवारी २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता शहर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अर्शद सलिम शेख वय ५२ रा. उस्मानिया पार्क, जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.