नागपूर ग्रामीण: नागपुरात अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांवर धाड; ७.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
वाडी पोलीस आणि कृषी विभागाच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत अवैधपणे वाहतूक केले जाणारे बोगस एचटीबीटी कापूस बियाणे पकडले आहे. या कारवाईत ७.१९ लाख रुपये किमतीची ७९८ बियाणे पाकिटे आणि १.५० लाखांची पिक-अप व्हॅन जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी योगेश डबरासे आणि समीर काकडे या दोन आरोपींविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.