शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लिंबागणेश येथे शेतकऱ्यांचे तीव्र निदर्शने
Beed, Beed | Oct 30, 2025 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह विविध शेतकरीविषयक मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.