आज दि.5 डिसेंबर ला 12 वाजता हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला बहुउद्देशिय हॉल येथे आयोजित कार्यक्रमास आ. करण देवतळे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या उर्जेला, कलेला आणि क्रीडास्पर्धेतील प्रतिभेला भेटण्याचा आनंद लाभला.असे आ. देवतळे म्हणाले. शाळेच्या प्रगतीत योगदान देणारे सर्व मान्यवर, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांची उपस्थिती विशेष ठरली.