नागपूर ग्रामीण: न्याय देण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण : ८५ फूट खोल दरीत बुलेट कोसळून दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू
बुटीबोरी येथील वारंगा टोली मार्गावर एका भीषण अपघातात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सक्षम विनोद बनसोड आणि आर्यन रवींद्र सोनटक्के अशी मृतांची नावे असून, ते दोघेही कायद्याचे शिक्षण घेत होते. बुधवारी रात्री जेवण करून परतत असताना चालकाचे बुलेटवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ८५ फूट खोल दरीत कोसळली. आर्यनचा मोबाईल हॉटेलमध्ये विसरल्यामुळे संशय बळावला. मित्रांनी आणि वॉर्डनने रात्रभर शोध घेतला, मात्र अंधारामुळे यश आले नाही.