नांदेड: हैदरबागेतील हायटेक इंन्टरप्रायजेस सर्विस सेंटर फोडुन चोरट्याने 78 हजाराच्या 78 बॅट-या केल्या लंपास;इतवारा पोलीसात गुन्हा
Nanded, Nanded | Nov 2, 2025 नांदेड शहरातील हैदरबाग येथील हायटेक इंटरप्राईजेस सर्विस सेंटरचे कंपाऊंडचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून राजा कंपनीचे दुरुस्तीसाठी आलेल्या 78 बॅट-या कून किमती 78 हजारचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. सदरची हि घटना दि 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेनऊ ते दि 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी परवेज रसूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी इतवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.