अकोला: शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोलीस निरीक्षकांकडून ऑटोचालकांसाठी वाहतूक समुपदेशन
Akola, Akola | Sep 16, 2025 शहर वाहतूक नियंत्रण शाखेत 16 सप्टेंबर रोजी ऑटोचालक व युनियन पदाधिकाऱ्यांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी वाहतूक नियमांचे पालन, गणवेश परिधान, विना परमिट ऑटो न चालविणे, ठराविक ठिकाणीच पार्किंग, तसेच नशा करणाऱ्यांना किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ऑटो न देण्याच्या सूचना दिल्या. सूचना न पाळणाऱ्यांवर १८ सप्टेंबरपासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जाणार आहे. चा