जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या नगर विकास विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अहवालानुसार, आज २० डिसेंबर रोजी पार पडलेल्या भंडारा नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १२ अ व १५ अ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी ५५.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. भंडारा नगरपरिषद क्षेत्रात एकूण ८,१०७ पात्र मतदारांपैकी ४,४९० मतदारांनी (२,२४४ पुरुष आणि २,२४६ महिला) आपला मतदानाचा हक्क बजावला. आजची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या २१ डिसेंबर रोजी.