वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये प्रवेश रोखण्यासाठी वन विभागासमोर आंदोलन छेडणार, कोदेच्या सरपंच शोभा पाटील यांचा इशारा
गगनबावडा तालुक्यात वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानी बरोबरच, मनुष्य प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलं आहे. त्याकडे वन विभागाने काना डोळा केला आहे. वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ नये यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आज मंगळवार दिनांक 3 जून दुपारी तीन वाजता गगनबावडा तालुक्यातील कोदे गावच्या सरपंच शोभा पाटील यांनी दिला