जालना: महिला रुग्णांच्या त्रासावर मनसेचा संताप; डॉक्टर-कर्मचार्यांना बाहेर काढण्याचा इशारा
Jalna, Jalna | Apr 29, 2026 जालना जिल्हा स्त्रीरुग्णालयातील रुग्णांना भेडसावणार्या गैरसोयींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा गंगातिवरे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील महिला रुग्णांशी होणारी गैरवर्तणूक, अपुरी सेवा आणि कर्मचार्यांची निष्क्रियता याबाबत तक्रारी वाढत असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रेखा गंगातिवरे यांनी जिल्हा स्त्रीरुग्णालयाला भेट दिली.