बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि.24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता, झालेल्या बैठकीत दिव्यांग कल्याण योजनांची अंमलबजावणी, UDID कार्ड वाटप आणि शासकीय इमारती सुलभ करण्यावर भर देण्यात आला.संजय गांधी निराधार योजनेतील अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश देण्यात आले. दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी नियोजनबद्ध खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असून, जिल्ह्याती