नगर: 'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी' सकल ओबीसी समाजाचा इशारा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीच्या मार्फत लाच मागितल्याचं समोर आला आहे.. त्यावर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी अन्यथा अहिल्यानगर सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.