अहमदपूर: अहमदपूर-नांदेड रोडवर एमआयडीसीतील शासकीय वसतिगृहासमोर भीषण अपघात; बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
Ahmadpur, Latur | Sep 15, 2025 अहमदपूर-नांदेड रोडवर भीषण अपघात; बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू अहमदपूर-नांदेड रोडवर एका बसच्या धडकेत एका 30 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शंकर पुंडलिक गुणाले (रा. मरशिवणी, ता. अहमदपूर) असे मयत तरूणाचे नाव असून, या प्रकरणी बस चालकाविरुद्ध दि 14 सप्टेंबर रोजी अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.