परळी: त्या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया, ती ऑडिओ क्लिप ए आय द्वारे बनवली असू शकते
Parli, Beed | Nov 8, 2025 मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी अलीकडेच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित कॉल रेकॉर्डिंग पत्रकार परिषदेत ऐकवला.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं की, 'आजच्या काळात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने काहीही तयार करता येतं. माझा फोन २४ तास सुरू असतो, गोरगरीब लोक नेहमी मला फोन करतात. त्यामुळे त्या व्यक्तीशी फोनवर बोलणं झालं असेल, पण तुम्हाला संपवण्याचा उद्देश कधीच नव्हता,' असं मुंडे यांनी स्पष्ट केलं.