अकोट: सरस्वती नगर येथिल धुराचे लोट निघणारी सदोष डीपी अखेर बदलण्यात आली;महावितरणची तत्पर सेवा
Akot, Akola | Oct 13, 2025 शहरातील सरस्वती नगर येथील भाग्यश्री दूध डेरी जवळच्या विद्युत डीपीवरून २ दिवस आधी धुराचे लोट निघत असल्याची बाब नागरिकांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली असता या ठिकाणी महावितरणने तात्काळ पाहणी करून डीपी दुरुस्तीसाठी हालचाल केली होती दरम्यान आज महावितरण द्वारा या ठिकाणी नवीन डीपी बसवण्यात आल्याने महावितरणच्या तत्पर सेवेबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तर या ठिकाणच्या या आधीच्या नादुरुस्त डीपी मुळे मोठी दुर्घटना किंवा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवला जात होती.