दिग्रस: तालुक्यातील आष्टा येथील देवीच्या मंदिरातून सोन्याचे दागिने चोरी, अज्ञात चोरट्या विरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
दिग्रस तालुक्यातील आष्टा गावात देवीच्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराचे दार तोडून देवीच्या गळ्यातील सुमारे ३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:३० सुमारास घडली. या प्रकरणी संदीप लालसिंग चव्हाण (वय ३४, रा. आष्टा) यांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:१५ वाजता दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हे दाखल केले.