शादी डॉट कॉम वर लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शादी डॉटकॉमवर ओळख झालेल्या व्यक्तीने घटस्फोटीत महिलेस 'तुझ्या सोबत विवाह करतो, तुझ्या मुलालाही स्विकारतो', असे आश्वासित करत त्या महिलेशी सातत्याने शरीर संबंध ठेवले. त्यातून घटस्फोटीत महिला गरोदर राहिली. तो गर्भही बळजबरीने रुग्णालयात जाऊन पाडला. यासह 'तुझे व्हिडिओ, फोटो व्हायरल करील' 'तुला माझ्याशिवाय पर्याय नाही, मी आता तुझ्याशी विवाह करणार नाही', असं म्हणत सातत्याने धमक्या दिल्या प्रकरणी संभाजीनगर येथील भूषण गायधनी याच्या विरोधात सदरील घटस्फोटीत महिलेच्या फिर्यादीवरून बलातकारासह अन्य