कल्याण: कल्याणच्या मोहने येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल
Kalyan, Thane | Oct 23, 2025 कल्याण मोहने परिसरात दोन गटात काल राडा झाला होता. फटाक्याचे स्टॉल लावण्यावरून हा राडा झाला होता. दोन्ही गटांनी पोलिसांसमोरच दगडफेक, तोडफोड करत एकमेकांना हाणामारी केली होती. मात्र या प्रकरणी आता खाडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटातील 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास दिली आहे. तसेच काही आरोपींना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.