परळी: परळी नाथरा हायवेवर बुलेट आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार गंभीर
Parli, Beed | Sep 24, 2025 बीड जिल्ह्यातील परळी ते नाथरा रोडवर दुपारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. यश कन्स्ट्रक्शनच्या हायवा (क्र. एमएच 44 यू 2944) ने समोरून येणाऱ्या बुलेट (क्र. एमएच 44 एएफ 8464) दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या भीषण धडकेत बुलेटचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त तरुण हा लिंबोटा गावातील असल्याचे सांगितले जात आहे. यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या रस्त्यावर सिमेंट हायवेचे काम सुरू असताना हा अपघात घडला.