जिल्ह्यातील बल्लारपूर येथील स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र येथे आज दि 25 ऑक्टोबर 5 वाजता आ.सुधीर मुनगंटीवार भेट देऊन केंद्रातील सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि उद्घाटनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. लवकरच या केंद्राचे उद्घाटन होणार असून, महिला व मुलींसाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र व्हावे ही माझी इच्छा आता साकार होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. हे केंद्र त्यांच्या स्वावलंबनाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल असा ठाम विश्वास असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.