अकोला: बाजारात पावसामुळे झेंडू फुलांची दर घसरण
Akola, Akola | Oct 21, 2025 दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे बाजारातील झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. परिणामी, झेंडू फुले केवळ दहा रुपये किलोने विकली गेली. फुलांचा साठा वाचवण्याऐवजी काही व्यापाऱ्यांनी फुले तशीच सोडून दिली व निघून गेले. भाव कमी झाल्याने व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.