भाजप सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजवरही ती अमलात आणलेली नाही. तसेच वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून ती अजूनही शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेली नाही. त्यामुळे या दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात अंधार घालण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे.